पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.२४ : दारूच्या नशेत मित्रानेच मित्राच्या डोक्यात सिलेंडर मारून हत्या केल्याची खळबळ जनक घटना वाघोली परिसरात घडली आहे. ही घटना सिन्ट्रोन कन्स्ट्रक्शन साईटवर रात्री ११ च्या सुमारास घडली आहे. शैलेश रमेश मांडगीकर (वय २५) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी एकाला अटक केली असून दुसरा फरार आहे.
राम श्रीराम (वय २५ रा.मु.पो.बेरळी – बुद्रुक,मुखेड, जि.नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर मृत व्यक्ती दहा दिवसांपूर्वी पुण्यामध्ये काम करण्यासाठी आला होता. सदर मृत व्यक्ती कन्स्ट्रक्शन साईटवर दारू पिऊन मित्रांसोबत पैशावरून भांडण करायचा. (दि.२२) ऑगस्टच्या रात्री आरोपी गोपाळ ज्ञानोबा गोटालापुरे (वय २५ रा.महादेव नगर,लातूर) याने फिर्यादीच्या डोक्यात तीन किलोचा सिलेंडर मारून फरार झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती पाटील करीत आहेत.












