पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि.१७ : थेरगाव येथील ३० वर्षीय युवकाचा खून करून त्याच्या मित्राने त्याचा मृतदेह नाल्यात टाकून दिला. हि धक्कादायक घटना दि ५ रोजी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरज उर्फ जंजीर कांबळे हा दिं. ५ रोजी त्याचे मित्र पंकज पाचपिंडे व अमरदीप उर्फ लखन जोगदंड यांचे सोबत दारू पिण्यासाठी पंकज याच्या घरी जय मल्हार कॉलनी नं. ५, थेरगाव येथे गेला होता. दारू पीत बसले असताना सुरज कांबळे यांनी पंकज व अमरदीप यांना आई बहिणी वरून घाणेरड्या शिव्या दिल्या रागाच्या भरात पंकज व अंबर यांनी चाकूने सुरज कांबळे याचे गळ्यावर वार करून त्याचा खून केला त्यानंतर पंकज पाचपिंडे चालवीत असणारा तीन चाकी टेम्पोमध्ये सुरज कांबळे यांची बॉडी एका गोधडीत गुंडाळून बावधान येथील गायकवाड वस्ती मधील हायवे खाली नाल्यात टाकून दिली.
सुरज कांबळे याची मिसिंग ची तक्रार वाकड पोलीस स्टेशन येथे दिनांक सात रोजी त्याची पत्नी आरती सुरज कांबळे यांनी दाखल केली होती. आता सुरज कांबळे मिसिंग झाल्यापासून त्याचे बाबत कोणतीही माहिती मिळत नव्हती दिनांक अकरा रोजी आरती सुरेश कांबळे यांनी पोलिसांना पुरवणी जबाब दिला त्यामध्ये सुरज हा त्याचे मित्र पंकज याची सोबत दारू पिण्यासाठी गेले होते त्यानंतर ते परत घरी आले नसल्याबाबत ची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.
मिसिंगची तक्रार दाखल झाल्यानंतर पंकज पाचपिंडे याचा फोन बंद करून कुठेतरी निघून गेला असल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे सदर मिसिंग मध्ये काहीतरी गंभीर घटना घडली असावी हे ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांचे अधिनस्त तपास पथकातील सह पोलीस निरीक्षक संतोष पाटील पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण व त्यांची टीमने मिसिंग व्यक्तीच्या सर्वतोपरी शोध घेतला व त्याचप्रमाणे प्रकटीकरण विभागातील अधिकारी व आमदार यांनी सुरज सोबत दारू पिणारे पंकज पाचपिंडे व अमर उर्फ लखन दशरथ जोगदंड यांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत यांना बीड जिल्ह्यातून ताब्यात घेऊन चुकून चौकशी केली असता त्यांनी वरच्या प्रकाराबाबत कबुली दिली असता त्यांनी ज्या ठिकाणी बॉडी टाकली होती त्या ठिकाण शोध करून पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली आहे.
सुरज कांबळे याची बॉडी शो मी चलनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पंकज पाचपिंडे वय 28 व अमरदीप उर्फ लखन जोगदंड वय 33 यांच्या विरोधात वाकड पोलिसांनी भा.दं.वी. कलम ३०२, २०१,३४ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपास वाकड पोलीस करत आहे.












