पुणे प्रतिनिधी
पुणे, दि. २२ : संपूर्ण भारत देशाला विळखा टाकलेल्या हृदयरोगाचा नायनाट करण्याच्या उद्देशाने माधवबाग पिंपरी, मोरवाडी आयोजित “हार्दिक” या सुंदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
धन्वंतरी पूजेनंतर कार्यक्रमाची सुरूवात झाली. या कार्यक्रमामध्ये पिंपरी मोरवाडी येथे उपचार घेवून पूर्ण बरे झालेल्या रुग्णांचा (रिव्हर्सल हीरो) म्हणून सत्कार झाला. एकूण ४० रुग्णांचा सत्कार हा माधवबागसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे डॉ. शीतल मोरे – म्हैसने यांनी सांगितले.
या कार्यक्रमावेळी अनेक रुग्णांनी आपल्या आजारावरील मात केल्याचे अनुभव संगितले. पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिस खात्याचे पोलिस निरीक्षक यांनीही त्यांना भेडसावत असलेल्या रक्तदाबाविषयी आणि माधवबागमध्ये आल्यानंतर कशाप्रकारे त्यांचा असाध्य असा रक्तदाब आटोक्यात आला याविषयी त्यांनी संगितले. त्यांनी सांगितले की, आजच्या ५० वर्ष पार केलेल्या कोणत्याही व्यक्तीने आपल्या छोट्या छोट्या त्रासाकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टर यांच्याशी संपर्क साधावा.
यावेळी स्नेहल सुकते यांनी सांगितले की, त्यांचे वडील सुरेश सुकते हे कोविडमध्ये घेतलेल्या गोळ्यांमुळे त्यांना डायबेटीस झाल्यामुळे त्यांना किडनीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांच्या वडिलांना घेऊन मोरवाडी माधवबाग येथे उपचार घेतले आणि महिन्याभर व्यायाम केल्याने त्यांचा आज सर्व त्रास दूर झाला आहे. स्नेहल यांनी माधवबागच्या मुख्य डॉ. शीतल मोरे यांचे याबाबत आभार मानले.
या कार्यक्रमाद्वारे हृदयाचे स्पंदन, आरोग्यदर्शन, ‘निरोगी हृदय निरोगी जीवन’ हा नारा देण्यात आला. आजारातून बाहेर पडलेल्या सर्व रुग्णांचे यावेळी प्रशस्तिपत्रक देवून कौतुक करून सत्कार करण्यात आला.
प्रत्येक घरामध्ये हृदयविकार, किडनी शुगर अशा प्रकारचे रुग्ण असतात यांना आजारावर घेत असलेल्या गोळ्या मुक्त करण्याबाबत पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक अभियान ‘माधवबाग’ यांनी आयोजन केले होते. शरीरात साखर वाढल्यावर रक्त घट्ट होण्याची भीती असते. डोळे, किडनी, हृदय यांना देखील त्रास होऊ शकतो त्यामुळे आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य आहार, उपचार घेऊन आजार मुक्त होऊ शकतो असे यावेळी डॉ. शितल मोरे यांनी सांगितले.












