पिंपरी – अनेक राजकीय नेते मराठा समाज जारांगेच्या पाठीशी असला तरी अनेक राजकीय नेते त्यांच्यावर टीका करत आहेत. मनोज जरांगे स्वत:ला राजा समजू लागले आहेत आणि वागू लागले आहेत. त्यांनी आरक्षणावर बोलवं त्यांनी मर्यादेत बोलावं ते आता मर्यादेत न बोलता आरक्षण सोडून राजकारणामध्ये आले आहेत, अशी गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. महाजन यांच्या या टीकेनंतर मनोज जारांगेंनीही त्यांच्यावर पलटवार केला.
जरांगे म्हणाले की मोदीसाहेब आले गेले, मला चॅलेंज देऊ नका, जनता आम्हाला कळते, तुम्ही आमचे काय लाड केले, मला बोलायला लावू नका, समाजाला एक सांगतो मी सामाजासाठी लढत आहे, समाजच माझा मालक आहे. त्यांच्या शब्दापुढं मी जात नाही. तसेच १० टक्के आरक्षण मान्य करण्यासही त्यांनी काही अटी सरकारसमोर मांडल्या आहेत. हे १० टक्के आरक्षण एकूण आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या आत घेतले पाहिजे, अशी अट मनोज जरांगे यांनी घातली आहे. जरांगे यांनी फडणवीसांना अरे करे केलं असे म्हणत त्यांच्यावर आरोप झाले. याला प्रत्युत्तर देत जरांगे म्हणाले मी अरे तुरे केले अशी टीका माझ्यावर झाली. मग अहो जाओ केल्यानंतर सगे सोयऱ्याची मागणी पूर्ण करणार का? मग रोज अहो जाओ करतो. पुढे त्यांनी मराठा समाजाला सूचना केली कि, एकनाथ शिंदे यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांच्याकडून अपेक्षाही आहे. पण त्यांनीही समाजाची नाराजीची लाट ओढून घेऊ नये, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून लोकसभा निवडणुकीची संधी द्यावी, अशी मागणी केली आहे. बुधवारी महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची बैठक पार पडली यामध्ये त्यांनी जरांगे यांना जालन्याची सीट देण्याबाबत चर्चा केली आहे. यावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी प्रकाश आंबेडकर यांचा कसा शब्द टाळू, तरीही माझा फोकस फक्त आरक्षणावर आहे. त्यानंतर ते म्हणाले की, “माझा राजकीय नाही, माझा समाजिक लढा आहे. मी माझ्या समाजाविरोधात जाणार नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. सध्या मनोज जरांगे आपल्या निर्णयावर ठाम असून कोणत्याही राजकीय खेळीला बळी पडणार नसल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. वंचित आघाडीनंतर शेतकरी संघटनेनेहि जारांगेंना पाठिंबा दिला. तसेच निवडणुकीला अपक्ष उभे राहून निवडणूक लढवण्याचा सल्लाही स्वाभिमानी शेतकरी संघटनाने दिला.