२६ जुन आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिवसाच्या पार्शवभूमीवर मा. महासंचालक, मा. पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेशावरुन मा. अपर पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – ५ पुणे शहर श्री विक्रांत देशमुख, मा.सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर श्रीमती अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील शालेय विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाचे दुषपरिणाम या बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

मुंढवा पोलीस ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णू ताम्हाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रदीप काकडे तसेच सहा. पोलीस निरीक्षक, समीर कपरे, विलास सुतार, साहेबा पोटे, पोलीस उपनिरीक्षक, प्रमोद कोळेकर, अनिल बिनवडे, शिवाजी काटे, अश्विनी भोसले, धनंजय गाडे, गणेश कुलाळ, संदीप जोरे व पोलीस अंमलदार तानाती देशमुख, शिलत काळे, दत्ता जाधव, उज्वला बनकर, विजय माने यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा, विद्यालय, महाविद्यालय ठिकाणी जावून अंमली पदार्थाचे अहारी न जाता नित्यनियमाने व्यायाम, योगा, ध्यान, अभ्यास, मैदानी खेळ, सायकलिंग करुन आपले शारिक व मानसिक स्वास्थ मजबुत करण्या बाबत मार्गदर्शन केले. तसेच अशा प्रकारच्या शारिरीक कसरतींची आवड निर्माण करुन वाईट सवयी पासून लांब राहणे, चांगल्या सवयी आंग वळणी पाडाव्यात. अनोळखी इसमांनी दिलेले कोणतीही खाद्य वस्तू खावू नये, मोबाईल फोनचा वापर करताना सोशल मिडीवर येणाऱ्या जाहिरातीवर विश्वास ठेवू नये, व्यसनापासून होणारे दुष्पपरिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सदरचे कार्यक्रम लोणकर महाविद्यालय, राजर्षी शाहू महाराज विद्यालय, शहिद भगतसिंग प्राथमिक शाळा, आदर्श प्राथमिक शाळा, ज्ञानदिप स्कुल, घोरपडी व्हिलेज स्कुल, सेंट जोसेफ स्कुल इ. ठिकाणी भेटी देवून व्यसनमुक्ती जनजागृती करण्यात आली आहे. जनजागृती करीता बॅनर, होर्डींग देखील लावण्यात आले तसेच सदर उपक्रमाचे फोटो व्टिटर, फेसबुक इ. माध्यमातुन सोशल मिडीयावर अपलोड करुन व्यसनमुक्ती संदेश दिला आहे. सदरचा उपक्रम राबविण्यात आला असल्याने शाळा, विद्यालय, महाविद्यालयातील मुख्यध्यापक, प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शन हे अतिशय बहूमुल्य आहे असे बोलून पुणे शहर पोलीस दलाचे तसेच मुंढवा पोलीस ठाण्यातील अधिकारी अंमलदार यांचे आभार मानले आहेत.

सदर कार्यक्रमाचे नियोजन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णू ताम्हाणे यांचे सुचना प्रमाणे पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार तानाजी देशमुख, स्वप्निल शिवरकर, रविंद्र देवढे, शितल काळे यांनी उत्तम प्रकारे केले होते.












