पुणे प्रतिनिधी
पुणे, दि.१९ : मुलींची छेडछडा करणाऱ्या फरार आरोपीस [accused ] पुणे पोलिसांनी अटक केली आहे. आदित्य ऊर्फ बकासुर अविनाश मोरजकर (वय १९ रा. वडार वाडी, शिवाजीनगर) असे अटक [arrested ] करण्यात आलेल्याचे नाव आहे. हि कारवाई दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -१, गुन्हे शाखेने [ crime branch ] केली आहे.
सदर आरोपीवर चतु: शृंगी पोलीस स्थानकात [ chaturshrungi police station ] गुन्हा दाखल आहे. सदर पोलीस स्थानकाच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान, पोलीस अंमलदार धनंजय ताजने, मॅगी जाधव,प्रदीप राठोड यांना बातमीदारा मार्फत फरार असलेला आरोपी जनसेवक चौक,क्षितीज सोसायटी च्या मागे घोडा बग्गीच्या मागे उभा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. अंग झडती दरम्यान त्याच्याकडून एक लोखंडी कोयता जप्त करण्यात आले आहे. आरोपी विरोधात चतु: शृंगी पोलीस स्थानकात आर्म ॲक्ट कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पुणे आयुक्त रितेश कुमार,पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सह आयुक्त सुनील तांबे, गुन्हे -१, यांच्या मार्गदशन खाली
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -१ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर,पोलीस उप निरीक्षक शाहिद शेख, पोलीस अंमलदार धनंजय ताजने, मॅगी जाधव,प्रदीप राठोड,गणेश ढगे,यांनी केले आहे.












