पुणे प्रतिनिधी
पुणे दि. २९ : सध्या पुणे शहरात मेट्रो उड्डाण पूल बांधण्याचे काम सुरु आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम सुरु आहे. या दरम्यान विद्यापीठ चौकात (सावित्रीबाई फुले) मेट्रो पिलारचे दुमजली काम सुरु होत असून एलबी हाऊस (रेंजहिल्स कॉर्नर) या ठिकाणी रस्त्याच्या मध्यभागी दुमजली पिलारचे सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे रेंजहिल्स कॉर्नरकडे जाण्यासाठी रस्ता काही काळासाठी बंद कऱण्यात येणार आहे. रेंजहिल्सकडे जाणाऱ्या नागरिकांची गैर सोया होऊ नये या साठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग : शिवाजीनगर कडे येऊन रेंजहिल्स जाण्यासाठी कॉसमॉस बँके समोरून युटर्न घेऊन रेंजहिल्स कॉर्नर येथे डावीकडे वळून नागरिक इच्छित स्थळी जाऊ शकतात.












