पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : मोकळ्या मैदानात असणारी मीटरची केबल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी सतीश नरहरी चव्हाण ( वय ३५, रा .सत्यपूरम सोसायटी, भेकराई नगर, हडपसर ) यांनी सुरेश परमात्मा सोनी ( वय २१, रा.गंगा नगर, आकुर्डी ), रामजी चव्हाण, कल्लू आणि सब्बू यांच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
दिनांक २३ रोजी मेघा वॅट प्लॉट टाटा कम्युनिकेशन लिमिटेड कंपनीची मोकळ्या मैदानात असणारी मीटरची केबल चोरीला गेली आहे. ही केबल ४०,००० किमतीची कॉपर असलेली एक हजार मीटरची आहे. आरोपींनी ती केबल फिर्यादी यांच्या संमतीशिवाय चोरून नेली आहे.
आरोपींवर भादवि कलम ३७९,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सुरेश परमात्मा सोनी या आरोपीस अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार पोटे हे करत आहेत.












