
शुक्रवारी (दि ०७) रोजी काँम्बींग ऑपरेशन दरम्यान भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील आरोपी चेक करत होते. यावेळी पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, विक्रम सावंत, राहुल तांबे यांना बातमीदारामार्फत मागील सहा महीन्यापासुन फरार असलेला आरोपी ओंकार दादाभाऊ बारावकर, ऊर्फे ओमी (वय १९ वर्षे, कात्रज) हा संतोषनगर, जैन मंदीराजवळील नाकोडा मंदाराजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने सदर ठिकाणी जावुन आरोपीला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी आरोपीला अधिकारी मा. नारायण शिरगावकर, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे यांच्या ताब्यात देण्यात आले असुन सदर आरोपीला अटक केली आहे.
आरोपी विरोधात भरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजि नंबर ११९/२०२३ भा.द.वि कलम ३०७,३२३,१४३,१४४,१४७, १४८, १४९ आर्म अॅक्ट ४ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३)सह १३५ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) अंतर्गत गुन्हा नोंद आहे.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे श्री. प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ २, श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे श्री. नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुंभार, तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उप निरीक्षक सागर भोसले, पोलीस अंमलदार अभिजीत जाधव, विक्रम सावंत, राहुल तांबे, सचिन सरपाले, निलेश ढमढेरे, चेतन गोरे, मंगेश पवार, हर्षल शिंदे, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, अशिष गायकवाड, यांच्या पथकाने केली आहे.












