पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी मुकाई चौक येथील पत्राशेड मालक यांचे धागेदोरे आहेत असे आरोप मनसे कामगार सेनेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन शिंगाडे यांनी केले आहे. आज दि. १० फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील ब क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मुकाई चौक येथे अतिक्रमण पथकाने कारवाई केली. मात्र पत्रा शेड व खाऊ गल्ली चे मालक यांच्यावर कारवाई न करता अतिक्रमण पथकाने चक्क फेरीवाल्याचे गाड्या उचलल्या.
ऐनवेळी सचिन शिंगाडे हे त्या ठिकाणी पोचले असता महानगरपालिकेचे ब क्षेत्रीय पथक हे कारवाई करत असल्याचे त्यांना समजले. पथकातील कर्मचारी हातगाडीवर फिरून द्राक्षे विकणाऱ्या फेरीवाल्याचे द्राक्षे उचलून ट्रेमध्ये भरत असताना शिंगाडे यांनी विचारले असता ‘आम्ही द्राक्षे भरायला मदत करत आहोत आणि हातगाडी उचलून नेत आहोत ‘ असे उत्तर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याकडून त्यांना मिळाले, मग तुम्ही गुप्ता यांच्या अधिकृतपणे बांधलेल्या पत्रा शेड वर कारवाई का करत नाही ते का पडत नाही? असे प्रश्न शिंगाडे यांनी विचारले असता आम्हास पंडित मॅडमनी या कारवाई करायला सांगितले आहे असे उत्तर त्यांना अधिकाऱ्यांकडून मिळाले. दरम्यान सचिन शिंगाडे यांनी महानगरपालिकेचे व या व्यवसायाचे काही धागेदोरे आहेत, यांचे काही हितसंबंध असावेत असे आरोप करत यांच्यावर का कारवाई होत नाही असा संतप्त प्रश्न उपस्थित केला आहे.
महानगरपालिकेच्या आस्थापना विभाग व अनधिकृत बांधकाम विभागाच्या नियमांमध्ये पत्रा शेड मध्ये व्यवसाय करता येत नाही म्हणजेच पत्राशेडचा कमर्शियल वापर करता येत नाही असे स्पष्टपणे उल्लेख आहे मागील काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रातील पत्रा शेड व्यवसायिकांवर कारवाई करत ते पत्राचे पाळण्यात आले होते मात्र निवडक पत्रा शेड त्यातून वर्ग करण्यात आले आहे याचा नेमका कारण काय असा सुद्धा प्रश्न शिंगाडे यांनी उपस्थित केला आहे?