नेत्यांना साधेपणाने राहण्याचा जेपी नड्डा यांनी दिलेला सल्ला खरंतर पंतप्रधान मोदी यांनाच लागू पडतो. मोदींइतकी श्रीमंती गेल्या ७० वर्षांमध्ये कोणत्याही पंतप्रधानांनी भोगली नव्हती. मोदींचा हा श्रीमंतीचा थाट जनतेच्या पैशावर सुरू आहे. निवडणूक रोखे आणि पीएम केअर फंडात अब्जावधींच्या भ्रष्टाचाराची रक्कम भरण्यात आली आहे, त्यावर हा थाट सुरू आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
काल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा मुंबईत आले होते. यावेळी भाजपाच्या संमेलनात मार्गदर्शन करताना त्यांनी भाजपाच्या नेत्यांना साधेपणाने राहण्याचा सल्ला दिला. यावरून संजय राऊत यांनी आज टीका केली. ते आज सकाळी मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना
संजय राऊत म्हणाले, महागड्या गाड्यातून फिरू नका, सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका, असे जेपी नड्डा म्हणाले. म्हणजे मोदी करतात तसे गरीबीचे ढोंग करा, असे त्यांना सुचवायचे असेल. कारण, मोदींच्या पेनची किंमत २५ लाख रुपये आहे. घड्याळ, त्यांचे कपडे अतिशय महागडे असतात. मोदींसाठी २० हजार कोटी खर्च करून विमान घेतले आहे. मोदींचे सर्व मित्र अब्जाधीश असून त्यात चहा विकणारा कुणीही नाही.
संजय राऊत म्हणाले, भाजपा एकाबाजूला शेतकऱ्यांवर गोळ्या झाडते. महाराष्ट्रातील गरीबांची थट्टा करते, आमदारांना ५० कोटी देऊन सरकार बनविले जाते आणि दुसऱ्या बाजूला महागड्या गाड्या, घड्याळे वापरू नका, असे आवाहन केले जाते. जेपी नड्डा यांनी हे ढोंग बंद केले पाहीजे. भाजपाच्या शंभर टक्के नेत्यांच्या हातात महागडी घड्याळे आहेत. ९० टक्के भाजपा नेते परदेशी गाड्यातून फिरतात. संजय राऊत म्हणाले, निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाकडून लबाडी करण्यात येते हे चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत सिद्ध झाले. पंतप्रधान मोदी यांनी भाजपा ३७० जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.
याचा अर्थ हा आकडा गाठण्यासाठी तुम्ही आधीच यंत्रणा ताब्यात घेतल्या आहेत. ही लोकशाहीची थट्टा आहे, असा हि आरोप राऊत यांनी केला.