पुणे : पुणे पोलिसांकडून सोमवारी रात्री 10 ते मंगळवारी पहाटे 2 वाजण्याच्या दरम्यान शहरात राबवण्यात आलेल्या कोम्बींग ऑपरेशनमध्ये समर्थ पोलिसांनी नाना पेठेतील मच्छी मार्केटमध्ये मोबाईल चोरी करणार्या परप्रांतीयास अटक केली आहे.
कुंदनकुमार अर्जुन माहातो (25, रा. मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून 5 लाख 9 हजार रूपये किंमतीचे 29 स्मार्ट फोन जप्त करण्यात आले आहेत. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलिस हवालदार पोलिस हवालदार जितेंद्र पवार व रोहिदास वाघीरे यांना एक व्यक्ती नाना पेठेतील मच्छी मार्केटमध्ये संशयास्पद उभा असल्याची माहिती मिळाली.
मिळविलेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीची चौकशी केली असता त्याने मच्छी मार्केटमध्ये आलेल्या ग्राहकांचे मोबाईल चोरून परराज्यात विकत असल्याचे सांगितले. त्याच्याकडून 5 लाख 9 हजार रूपये किंमतीचे 29 स्मार्ट फोन जप्त करण्यात आले आहेत.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील,
पोलिस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय भोसले, पोलिस हवालदार रोहिदास वाघिरे, जितेंद्र पवार, गणेश वायकर, प्रमोद जगताप, पोलिस नाईक रहिम शेख, पोलिस अंमलदार कल्याण बोराडे, अमोल शिंदे, शरद घोरपडे, संदिप पवार, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, हेमंत पेरणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
मोबाईल चोर समर्थ पोलिसांच्या अटकेत












