पुणे : आज सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी प्रत्येकाच्या मोबाईल [ mobile ] फोनवर सरकारचे आपत्कालीन अलर्ट [ emergency alert ] पॉप-अप फ्लॅश होत आहेत. या ‘वायरलेस नोटिफिकेशन्स’ [ wireless notification ] कशाबद्दल आहेत, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. या मेसेजमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सरकारने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आणि नागरिकांना सतर्क करण्यासाठी वायरलेस सिग्नल [ wireless signal ] सुरू केले आहेत.
तुमच्या सभोवतालची कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, जसे की पूर, भूस्खलन, चक्रीवादळ, भूकंप इत्यादी आपत्कालीन परिस्थितींसाठी वायरलेस अलर्ट सुरू केले आहेत. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे तुम्हाला आपातकालीन परिस्थितीमध्ये मदत होणार आहे. धोक्याच्या परिस्थितीबद्दल चेतावणी मिळविण्यासाठी हे खूप उपयुक्त ठरणार आहे. चाचणी अलर्ट्सची सूचना देखील चालू करण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे हे अलर्ट चालू राहण्यासाठी आलेल्या मॅसेजेसला अनुमती द्या, असे सांगण्यात आले आहे.












