पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १९ : शिक्षण व प्रसार आणि जनजागृती अतंर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगणे व त्याबाबत जनजागृतीसाठी महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत १८ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची मोशी येथील कचरा डेपो येथे दोन सत्रात शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांचे निर्देशानुसार शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनातून १८ माध्यमिक विद्यालयातील उर्दू माध्यमिक विद्यालय, आकुर्डी या शाळेतील १०० विद्यार्थ्यांनी मोशी कचरा डेपो येथे आज भेट दिली.
यावेळी विद्यालयाचे शिक्षक नफिसा शेख, मुजम्मील खान, मोहम्मद वासिफ यांनी विद्यार्थ्यांना मोशी कचरा डेपोची माहिती दिली तसेच स्वच्छतेचे महत्व समजावून सांगितले.
स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत शहरामध्ये स्वच्छतेबाबत विविध उपक्रम राबविण्यात येतात. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत माहिती, शिक्षण व प्रसार आणि जनजागृती अंतर्गत कामकाज करताना शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगणे व त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.
याकरीता महानगरपालिकेतील १८ माध्यमिक शाळांची निवड करण्यात आली असून शाळांमधील विद्यार्थ्यांची मोशी येथील कचरा डेपो येथे दि. १८ सप्टेंबर पासुन पुढील १५ दिवस शाळेच्या कामकाजाच्या दिवसापर्यंत दोन सत्रात शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली आहे. सदर शैक्षणिक सहल यशस्वीरित्या पार पाडण्याचे महापालिकेच्या वतीने योग्य ते नियोजन करण्यात आले आहे.












