मोशी : दिनांक 5 फेब्रुवारी रोजी मोशी येथील कचरा डेपो समोरील दहा फुटी रोडवर एकाचा खून झाला होता भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा समांतर तपास दरोडा विरोधी पथक देखील करत होते. समर्थ बाबांच्या तपास करत असताना दरोडा विरोधी पथकाचे पोलीस हवालदार शेडगे व पोलीस शिपाई सावंत यांना त्यांच्या गुप्त बातमी मिळाली होती की संबंधित खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हे एका एम.एच. १४ जे.पी. २४३९ या नंबरच्या रिक्षामधुन भोसरी ते चाकणच्या दिशेने जात आहे.
सदर बातमीच्या अनुषंगाने दुर्गा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मिळून या रिक्षाचा शोध करत असताना त्यांना ती रिक्षा पुणे नाशिक रोडच्या कडेला थांबलेली दिसली त्यावेळेला शेती नाही त्यांनी चालकास ताब्यात घेऊन त्याला नाव व पत्ता विचारला असता व कसून चौकशी केली असता त्याने दहा फुटी रोडवर झालेल्या अमोल पवार याचे खून शुभम बाविस्कर व विजय फडतरे यांनी मिळून केला असल्याचे सांगितले व ते आत्ताच नारायणगावच्या दिशेने गेले आहे असे सांगितले.
या माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या परवानगी अन्वय, दुर्गादेवी पत्रकाचे कर्मचाऱ्यांनी नारायणगाव येथे धाव घेतली व संबंधित आरोपींचा शोध घेत असताना नारायणगाव बस स्टँड समोर रोडवर दोन इसम त्यांना संशयस्पद अवस्थेत उभे असल्याचे दिसून आले व त्यांच्या अंगावर रक्ताचे डाग दिसत होते हेच आरोपी असल्याची शक्यता आहे असे समजून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी शुभम बाविस्कर, वय २३, रा. धावडे वस्ती भोसरी व विजय फडतरे, वय २२, रा. कचरा डेपो समोर मोशी असे सांगितले.
अमोल पवार याचे झालेल्या खुनाबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरचा खून त्यांचा मित्र प्रशांत सुधाकर कांबळे, वय १९, रा. गुळवे वस्ती भोसरी याच्यामध्ये तिने केले असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांना पुढील चौकशीकामी दरोडा विरोधी पथक कार्यालयात आणून सदर खुनाबद्दल चौकशी केली असता त्या तिघांनी मिळून सदरचा खून केला असल्याची कबुली दिली.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त – विनयकुमार चोबे, अपर पोलीस आयुक्त – वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) – संदीप डोईफोडे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे १) – विवेक मोगलकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी,
पोलीस आमदार महेश खांडगे, उमेश पुलगम, राहुल खारगे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, प्रवीण माने, सागर शेडगे, प्रवीण कांबळे, गणेश सावंत, सुमित देवकर, चिंतामण सुपे, पो. हवा. माळी व पो.शी. हुलगे (तांत्रिक विश्लेषण विभाग) यांनी केली आहे.