पुणे प्रतिनिधी
पुणे दि. ४ : मौजमजेसाठी लोकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. तब्ब्ल ४५ लाख रुपयाच्या ७ गाड्या भामट्याकडून जप्त करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट – तीन ने ही कारवाई केली आहे. सयाजी ज्ञानदेव पाटील (वय ३५
रा.मानाजीनगर न-हे, मु.पो. ता. पिलूस, जि.सांगली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .
सदर आरोपीने फिर्यादी यांची इर्टिका गाडी शिरवळ येथे कंपनीत भाडे तत्वावर लावून देतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून कोणताही परतावा न देता आरोपीने गाडी परत न करता फिर्यादी यांची फसवणूक केल्या प्रकरणी सिंहगड पोलीसात गुन्हा दाखल केली होता. त्या अनुषंगाने पोलिसांनी आरोपीला बारामतीतून ताब्यात घेतले.
रामेश्वर दामोदर शेळके राहणार वारजे माळवाडी मारुती सुझुकी कंपनीची डिझायर कार,
रवींद्र जनार्दन जाधव रा. नऱ्हे फोर्ड कंपनीचे फेयस्टा कर, शशिकांत अमृत बरगे रा. सातारा मारुती सुझुकी कंपनीची इर्टिका, बाबू शंकर राठोड बोपखेल पुणे सुझुकी कंपनीची इर्टिका, विभुते मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार,गणेश सोपान धोत्रे रा. धायरी मारुती सुझुकी कंपनीची वॅग्नर कार, व फिर्यादी यांची कार असा एकूण सात चार चाकी वाहने आरोपीकडून जप्त करण्यात आले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सह पोलीस आयुक्त (गुन्हे -१) सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल पवार, पोलीस अंमलदार संतोष शिरसागर, राजेंद्र माने, शरद वाकसे, किरण पवार, सुजित पवार, संजीव कांबळे, सुरेंद्र साबळे, ज्ञानेश्वर चित्ते, सतीश कत्राळे, प्रकाश कटटे, पाटील, पडवाळ, करके, शिंदे, नेवसे, वाघमारे यांच्या पथकाने केले आहे.












