पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १० : यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेतर्फे ‘दिवाळी फराळ पाककृती स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या मॉडेल कॉलनी येथील अमित गार्डन रेस्टॉरंट,यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेचे महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.यामध्ये पाककलेच्या प्रशिक्षणार्थी,विद्यार्थिनी, महिला, गृहिणी, नोकरदार महिला मोफत सहभागी होऊ शकतात. दिनांक ३,४,५ व ६ नोव्हेंबर २०२३ रोजी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून दिनांक ०३ नोव्हेंबर रोजी लाडू व लाडूचे विविध प्रकार, दिनांक ०४ नोव्हेंबर रोजी शंकरपाळी, दिनांक ०५ नोव्हेंबर रोजी चिवडा पाककृती व दिनांक ०६ नोव्हेंबर रोजी चकली पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक स्पर्धक महिला स्पर्धेतील एका दिवशी किंवा चारही दिवसांच्या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. वय वर्षे १८ ते ५० वयोगटातील महिला या स्पर्धेसाठी पात्र असतील. या स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नसून सर्वांसाठी ही स्पर्धा विनामूल्य आहे. विशेष बाब म्हणजे या पाककृती स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या स्पर्धकांना पैठणी, नथ अशा प्रकारची आकर्षक बक्षिसे वितरित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
मोबाईल क्रमांक : 7709545894 / 9373434713.
स्पर्धेसाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत दिनांक : ३० ऑक्टोबर २०२३ पर्यंत आहे.
या स्पर्धेमुळे महिलांच्या पाककलेच्या कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध होण्यास मदत होईल, तसेच यामुळे या क्षेत्रात व्यावसायिक वाटचाल करण्यासाठीची प्रेरणाही महिलांना मिळेल असे मत यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी व्यक्त करत मोठ्या संख्येने महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.
महिलांसाठी दिवाळी पाककृती स्पर्धा : दिनांक ०३, ०४,०५ व ०६ नोव्हेंबर २०२३
वेळ : संध्याकाळी ०५ ते ०७ वाजेपर्यंत
स्पर्धा तपशील :
- लाडू पाककृती स्पर्धा : दिनांक ०३ नोव्हेंबर २०२३
- शंकरपाळी पाककृती स्पर्धा :दिनांक ०४ नोव्हेंबर २०२३
- चिवडा पाककृती स्पर्धा :दिनांक ०५ नोव्हेंबर २०२३
- चकली पाकककृती स्पर्धा :दिनांक ०६ नोव्हेंबर २०२३
विनामूल्य प्रवेश :
नावनोंदणी अंतिम मुदत : ३० ऑक्टोबर २०२३
स्पर्धचे नियम :
वयोमर्यादा : १८ ते ५० वर्ष
स्पर्धकांनी स्वतः तयार केलेलेच दिवाळी खाद्य पदार्थ स्पर्धेसाठी पात्र ठरतील.
स्पर्धेच्या ठिकाणी नियोजित वेळेच्या किमान २० मिनिटे उपस्थित राहणे आवश्यक.
प्रत्येक स्पर्धक एक किंवा चारही दिवस स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.
स्पर्धेतील विजेतेपदाबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील
संपर्क : मोबाईल क्रमांक : 7709545894 / 9373434713.
स्पर्धेचे ठिकाण :
अमित गार्डन रेस्टॉरंट,यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेचे,
महाराष्ट्र कौशल्य विकास केंद्र,
४१२/ डी, बहिरट पाटील चौक,
ओम सुपर मार्केट जवळ,मॉडेल कॉलनी,
शिवाजीनगर, पुणे – ४११०१६.












