पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २८ : येथे टपरी का टाकली असे म्हणत चार जणांनी टपरी मालकाला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना निगडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी अक्षय विठ्ठल पाटील ( वय २६, रा. त्रिवेणीनगर ), अक्षय खुडे, कामगार गणेश, कामगार गोपाल अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित संतोष नाईक यांची दुर्गानगर, निगडी येथे चहाची टपरी आहे.ते त्यांच्या मित्रासोबत टपरीवर असताना आरोपी तेथे आले.त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या मित्रास येथे टपरी का टाकली असे म्हणत शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.तसेच आरोपींनी टपरीतील चहाचे भांडे फिर्यादींच्या डोक्यात घालून त्यांना जखमी केले आहे.
आरोपींविरोधात भादवि कलम ३२४,३२३,५०४,३४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार केंगले हे करत आहेत.












