पुणे दि. १८ : पुणे शहरातील येरवडा वाहतूक विभागांतर्गत वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे सुरू राहण्याकरीता सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन ॲन्टी करप्शन शाखा कार्यालय व निवासस्थानाच्या समोरील मुख्य रस्त्यावर म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यापासून डावीकडे संरक्षण भिंतीच्यालगत १०० मीटर अंतरापर्यंत व सीबीआय ॲन्टी करप्शन शाखा कार्यालयाच्या डावीकडील संरक्षण भिंती लगत मुख्य रस्त्यापासून म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ५० मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग घोषित करण्यात आले आहे.
वाहतूक बदलाबाबत या तात्पुरत्या आदेशाच्या अनुषंगाने नागरिकांच्या काही सूचना व हरकती असल्यास त्या पोलीस उप आयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, येरवडा पोस्ट ऑफिस, बंगला क्रमांक ६, जेल रोड, पुणे यांच्या कार्यालयात २० ऑगस्ट पर्यंत लेखी स्वरूपात कळविण्यात याव्यात.
नागरिकांच्या सूचना व हरकतीवर विचार करून व अत्यावश्यक सेवेतील वाहने खेरीज करून वाहतूक बदलाबाबत अंतिम आदेश निर्गमित करण्यात येतील, असे उप आयुक्त वाहतूक, पुणे शहर विजयमुमार मगर यांनी कळविले आहे.












