पुणे : प्रसिद्ध संगीतकार, लेखक सलिल कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘एकदा काय झालं‘ या चित्रपटाला मराठीतील सर्वोकृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे कुलकर्णी यांचा सोमवारी (दि. 28) जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतरचा कुलकर्णी यांचा पुण्यातील पहिला सत्कार असणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी दिली. कार्यक्रम दि. 28 रोजी सायंकाळी 5:30 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे होणार असून कुलकर्णी यांचा सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सोमवारी सलिल कुलकर्णी यांचा जाहीर सत्कार












