पुणे प्रतिनिधी
पुणे दि.३१ : रॉय किणीकर यांच्या ‘घरटे शोधणारे पिस‘ या कार्यक्रमाचे 101 प्रयोग केल्याप्रित्यर्थ प्रसिद्ध गायिका, संगीतकार धनश्री गणात्रा यांचा रंगत–संगत प्रतिष्ठानतर्फे मंगळवारी (दि. 5 ) जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. रॉय किणीकर यांच्या स्मृती दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वार दिली.
कार्यक्रम दि. 5 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे होणार असून गणात्रा यांचा सत्कार गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्य उत्तरार्धात निमंत्रितांचे कविसंमेलन होणार असून यात प्रभा सोनवणे, धनंजय तडवळकर, केतकी देशपांडे, मिलिंद शेंडे, निलाक्षी महाडिक, निरूपमा महाजन, ऋचा घाणेकर, रुपाली अवचरे, शैलजा किंकर, स्वाती सामक, सुजाता पवार, सुजित कदम, तनुजा चव्हाण, वैजयंती आपटे, वासंती वैद्य, विजय सातपुते, राजश्री लेले यांचा सहभाग असणार आहे, असे संस्थेच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर यांनी सांगितले.












