पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २९ : हडपसर परिसरातील काळेपडळ येथील रद्दी व भंगार गोळा करणाऱ्या व्यावसायिकावर दोन इसमांनी धारदार हत्याराने वार केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना (दि.२८) रोजी सकाळी सडे अकराच्या सुमारास ओमकार कॉलनी, लक्ष्मी रद्दी डेपो दुकानात घडली आहे. या प्रकरणी एका ४५ वर्षीय व्यक्तीने हडपसर पोलिसात फिर्याद दिली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी कि दोन अनोळखी इसम मोटार सायकलवरून फिर्यादी यांच्या दुकानात आले. आरोपींनी धारदार हत्याराचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादीच्या पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. व दुकानात काम करत असलेल्या फिर्यादींच्या भावाच्या किशातील रोख १० हजार रुपये जबरी चोरी करून नेले. सदर परिसरात आरोपींनी हवेत हत्यार फिरवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली.
आरोपीं विरोधात भा.द.वि कलम ३९४,५०६,(२),३४ भारती हत्यार कायदा कलम ४(२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) १३५ क्रिमिनल लॉ ॲमेंटमेंट कायदा कलम ३,७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सह.पोलीस निरीक्षक प्रवीण अब्दागिरी करीत आहेत.












