पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २६ : रस्ता चुकलेल्या आजी बीट मार्शल मुळे सुखरूप घरी पोहोचल्या आहेत.ही घटना मुंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
बेबी मरियम अन्सारी ( वय ७०, रा.कसबा पेठ ) असे आजींचे नाव असून त्या दि. २४ रोजी मुंढवा परिसरात घाबरलेल्या अवस्थेत फिरत होत्या. बीट मार्शल पोलिस अंमलदार देवानंद खाडे व संदीप गर्जे हे गस्त घालत असताना त्यांना हा प्रकार लक्षात आला. आजींजवळ विचारणा केली असता त्या रस्ता चुकल्या असल्याचे समजले.त्यांना ओळख विचारल्यावर नाव बेबी कसबा पेठेत राहते एवढेच सांगितले.पण त्यांची ओळख पटविण्यासाठी आवश्यक अशा कोणत्याही वस्तू त्यांच्याजवळ नव्हत्या त्यामुळे त्यांना पोलिस चौकीत आणण्यात आले.
पोलिसांनी फरासखाना पोलिस स्टेशन येथे आजींचे वर्णन सांगून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेण्यास सांगितले. आजींच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना मुंढवा पोलिस स्टेशन येथे बोलवून घेतले.त्यावेळी त्यांचे जावई यांनी पोलिस स्टेशनला येऊन त्यांची खरी ओळख सांगितली.तपासावरून तेच आजींचे जावई असल्याचे निष्पन्न झाल्याने आजींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी, मा. पोलीस उप आयुक्त, श्री. विक्रांत देशमुख परिमंडळ-५ पुणे शहर, मा. सहा. पोलीस आयुक्त, श्रीमती अश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विष्णू ताम्हाणे यांचे सुचानाप्रमाणे पोलीस अंमलदार देवानंद खाडे, रमेश उगले, संदीप गर्ज यांनी केली आहे.











