मागील अनके दिवसापासून सोनसाखळी चोरांची बातमी आपण वाचतो. यामध्ये चोर दुचाकीवर येऊन स्त्रियांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरून घेऊन जातात. असाच एक प्रकार विश्रामबाग पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडला. फिर्यादी पत्र्या मारुती चौक पासून ओंकारेमेश्वर मंदिराकडे पायी जात होते. त्यावेळी मागून दुचाकीवर तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या उजव्या हातातील १०००० किमतीचा फोन चोरी केला.
विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात आरोपींवर भादविक ३९२ आणि ३४ च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत
रस्त्याने चालत जात असताना मोबाईलची चोरी












