व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकलेली राजकीय पोस्ट डिलीट केल्याच्या रागातून सात आठ जणांच्या टोळक्याने तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार शुक्रवारी (दि.२२) दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पुणे विद्यापीठातील आदर्श कॅन्टीन येथे घडली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अनिल भिमराव फुंदे (वय-२८ रा. जुनी सांगवी, पिंपरी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन राम तरपडे, करुण वाकोडे, वैभव दिघे, गणेश काकडे व त्यांच्या इतर तीन ते चार अनोळखी तरुणांवर भा.दं.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७ व १४९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्य महितीनुसार, फिर्य़ादी पुणे विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. आरोपीने व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकलेली राजकीय पोस्ट फिर्य़ादी यांनी डिलीट केली. याचा राग आल्याने आरोपींनी अनिल यांना फोनकरुन बोलावून घेतले. आरोपींनी पोस्ट डिलीट केल्याच्या रागातून फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच प्लास्टिकची खुर्ची डोक्यात मारुन जखमी केले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव करीत आहेत.