पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २२ : राजर्षी शाहु महाराजांनी शिक्षण, खेळ, कला, सामाजिक क्षेत्रातील उत्तुंग काम करणा-या व्यक्तिंचा यथोचित गौरव केला तसेच मदतीचा हात दिला. समाजपरिवर्तन करण्याची ताकद असणारा थोर समाज क्रांतिकारक राजा म्हणुन आपण राजर्षी शाहुंकडे बघतो. राजर्षी शाहुंच्या कार्याने प्रेरित होऊन राजर्षी शाहु महाराज सोशल फाउंडेशन या माध्यमातुन अखंड कार्यरत असतात.
याच विचारांचा एक भाग म्हणून राजर्षी शाहु महाराज जयंतीच्या निमित्ताने गेल्या ६ वर्षे पासून राजर्षी शाहु महाराज सोशल फाउंडेशन तर्फे “राजर्षी शाहु महोत्सव” हि संकल्पना राबवली जाते. या निमित्ताने समाजामध्ये क्रृतीशील कार्य करणा-या व्यक्तिंना राजर्षी शाहु महाराज सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील, तसेच वंचीत, अनाथ, अंध, गरीब, खेळाडू, होतकरू गरजू विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिष्यव्रृत्ती प्रदान करण्यात येते. या उपक्रमाचे हे ९ वे वर्षे आहे.
सामाजिक कार्यासाठीचे पुरस्कार जेष्ट सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव जाधव, गाथाप्रेमी युवा कीर्तनकार ह.भ.प.श्री.दत्ता महाराज दोन्हे पाटील, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय व सार्वजनिक मोफत वाचनालयाचे संस्थापक सुजित लक्ष्मण यादव यांना प्रदान करण्यात येणार आहेत. गड किल्ले संवर्धनासाठी किल्ले लळींग संवर्धन समिती, धुळे तसेच शिवप्रेमी सेवा संघ, ऍम्युनिशन फॅक्टरी खडकी व संविधान जनजागृतीसाठी लोकायत संस्थेचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत असतांना मदतीला धावून आलेल्या समाज बांधवांना परिवर्तन दूत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी. डॉ. प्रल्हाद शिंदे, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.नामदेव जवरे, डॉ. सचिन महाजन व डॉ.योगेशसिंह राजपूत यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून वर्षभरात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येते. प्रातिनिधिक स्वरूपात पन्नास विद्यार्थ्यांना या महोत्सवात शिष्यवृत्ती योजनेचे धनादेश देण्यात येतील. यामध्ये प्रामुख्याने किल्ले रायगड, भोर, वेल्हा, पवन मावळ व परिसरातील गरजू विद्यार्थ्यांचा सामावेश आहे.
राजर्षी शाहू महोत्सव २०२३ कार्यक्रमासाठी राष्ट्रमाता जिजाऊसाहेब यांचे वडील सिंदखेडराजाचे श्रीमंत लखुजी राजेजाधव यांचे १६ वे वंशज मा. श्री. शिवाजी राजे जाधव, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी उपमहापौर दिपकभाऊ मानकर, मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र दुबल, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक, विकास पासलकर, पुणे शहरातील जेष्ठ विधिज्ञ ऍड. मिलिंद पवार इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम रविवार दिनांक २५ जून २०२३ रोजी दुपारी १२ वाजता पंडित जवाहरलाल नेहरू औडोटोरियम, घोले रोड, महात्मा फुले म्युझियम समोर, छत्रपती शिवाजीनगर पुणे येथे पार पडणार आहे.












