गेल्या आठ-दहा महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे प्रकरण प्रलंबित होते. परंतु आता न्यायालयाने राज्य सरकारचा मार्ग मोकळा केला आहे. ज्यामुळे दीडशे एसीपींच्या (डीवायएसपी) बदल्या करण्यात आल्या आहेत.तसेच सरकारने तीन वर्षे रखडलेल्या १४३ च्या पीआयंना सुद्धा बढत्यांचा सुखद धक्का दिला आहे.
सोमवारी दिनांक २२ मे रोजी गृह विभागाने १४३ पोलिस निरीक्षकांना सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढती दिली आहे. तर, कार्यकाळ पूर्ण झालेल्या १५१ सहाय्यक आयुक्त तथा पोलिस उपअधिक्षकांच्याही बदल्या केल्या आहेत. पोलीस अंमलदार यांच्या पदोन्नतीचे आदेश राज्याचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी काढले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील 12, पुणे शहरातील 31, पुणे लोहमार्ग 6 आणि पुणे ग्रामीण मधील 3 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवडमधून बदली झालेल्या एसीपींतील प्रेरणा कट्टे (चाकण) यांची चिमूर (चंद्रपूर) येथे डीवायएसपी म्हणून करण्यात आली आहे.कट्टे या तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी किशोर आवारे यांच्या १२ मे रोजी झालेल्या खूनाचा तपास करत होत्या. त्यांची अचानक बदली झाल्यामुळे हा तपास लांबण्याची शक्यता आहे.
राज्यात दीडशे पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या












