पुणे प्रतिनिधी
पुणे दि.२४ : राज्य राखीव पोलीस बल क्र.१९ दलाच्या लेखी परीक्षे मध्ये गैर प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवार (दि.२३) रोजी सिंहगड कॉलेज कॅम्पस परिसरात परीक्षा केंद्रवर १२ ते ३ या वेळेत घडली आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून इतर तिघांचा तपास सुरु आहे.
पोलीस उप निरीक्षक अजित कुंभार यांनी सिंहगड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. योगेश रामसिंग गुसिंगे (वय १९ रा.मु. बोरसार, ता.वैजापूर,जि. संभाजीनगर), संजय सुलाने (वय १९ रा.गोकुळवाडी, ता. गंगापूर, जि.संभाजीनगर), योगेश सूर्यभान जाधव (वय २५ रा. शिवगडतांडा,ता.पैठण,जि.संभाजीनगर),लखन उदलसिंग नायमने (वय २१ रा. कात्राबाद,तासंभाजीनगर,जि.संभाजीनगर),असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सदर आरोपी हे परीक्षे केंद्रावर इलेकट्रोनिक डिव्हाइसच्या सहाय्याने पेपर सोडवत असल्याचे पर्यवेक्षकाच्या निदर्शनास आल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. सदर इलेकट्रोनिक डिव्हाईस हे बाहेर बसलेल्या व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे आढळले आहे.त्यांच्या कडून डिजिटल इलेकट्रोनिक डिव्हाईस जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी आरोपीं विरोधात सिंहगड पोलीस स्थानकात भा.द.वि कलम १८८,४२०,३४, अधिनियम १९८२ कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक दिपक कादबाने करीत आहे.












