पुणे: रात्रीच्या वेळी दुचाकीवरुन जाणाऱ्यांना मारहाण करुन लुटणाऱ्या टोळीला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून सोन्याची चेन व दोन दुचाकी असा एकूण १ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई घोरपडे पेठेतील मंत्रा हॉटेलच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत केली.
याबाबत रमेशकुमार गिरधारीलाल घाची (वय-२८ रा. कोंढवा) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी २९ मार्च रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास बोंबील मार्केट समोरील सार्वजनिक रोडवरुन घरी जात होते. त्यावेळी तीन जणांनी फिर्यादी यांची दुचाकी आडवली. आरोपींनी शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. तसेच जबरदस्तीने गळ्यातील ८० हजार रुपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची चेन चोरुन नेली. याप्रकरणी अभिषेक दशरथ वाघमारे उर्फ मम्या (वय-२२ रा. वजगाव ब्रु), मयुर किरण भोसले (वय-१९ रा. दांडेकर पुल), सुदर्शन विजय मोठे (वय-२३ रा. दांडेकर पुल) यांच्यावर भा.दं.वि. कलम ३९२, ३४१, ३२३, ५०४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली होती. आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार आशिष चव्हाण व प्रमोद भोसले यांना माहिती मिळाली की, जबरी चोरी करणारे घोरपडे पेठेतील मंत्रा हॉटेलच्या मागील बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत आले आहेत. मिळालेल्या माहितीची खात्री करुन पोलिसांनी सापळा रचून अभिषेक वाघमारे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मयुर भोसले व सुदर्शन मोठे यांना सापळा रचून अटक केली. आरोपींकडून चोरलेली सोन्याची चेन व दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड,
पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डेंगळे, अजीज बेग, पोलीस अंमलदार किरण ठवरे, हर्षल दुडम, संदीप तळेकर, आशिष चव्हाण, प्रमोद भोसले, अक्षयकुमार वाबळे, प्रशांत बडदे, लखन ढावरे, रफिक नदाफ, सागर कुडले, तुळशीराम टेंभुर्णे, महेश जाधव, चंद्रशेखर खरात, प्रवीण गावीत, सुहास साळुंके यांच्या पथकाने केली.