पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १३ : रात्रीच्या वेळी एकटे जाणाऱ्या नागरिकांना हत्याराचा धाक दाखवून जबरदस्तीने मोबाईल हिसकावणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट- चार कडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कडून चार लाख पंधरा हजार रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला असून १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
किशोर उत्तम गायकवाड (वय १९ रा. बोपोडी), अजय ऊर्फ ओंकार सुरेश गाडेकर (वय २१ रा.बोपोडी), आशिष ऊर्फ बोना संतोष सोजवळ (वय २४ रा. बोपोडी), जॉर्ज डॉम्निक डिसोजा (वय १९ रा. बोपोडी), साहिल ऊर्फ राहिल्या सलीम शेख (वय १९ रा. इंदिरा वसाहत, खडकी बाजार) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
आगामी गणेशउत्सवाच्या अनुषंगाने युनिट- चार कडील पथके परिसरात पेट्रोलिंग करत होते. या दरम्यान जुना – मुबंई हायवेय रोड, बोपोडी मेट्रो स्टेशन येथे साईबाबा मंदिरा जवळ तीन इसम चोरी केलेले मोबाईल कमी किंमतीत विकत असल्याची माहिती पोलीस अंमलदार अजय गायकवाड व सारस साळवी यांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींच्या झाडाझडतीत स्कूटरच्या डिकीतून १२ मोबाईल व एक चाकू सापडला.
तसेच इतर साथीदार हॅरिस ब्रिज, बोपोडी येथे थांबले असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यांच्या कडून ८ मोबाईल व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सदर दोन्ही वाहनाचा वापर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात रात्रीच्या वेळी हत्याराचा धाक दाखवून नागरिकांना कडून मोबाईल हिसकावून चोरी केल्याचे सांगितले. तसेच आरोपींकडून ११ मोबाईल जबरी चोरीचे व १ घरफोडीचे असे १२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सह पोलीस आयुक्त गुन्हे २ सतीश गोवेकर, पोलीस निरीक्षक गणेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक जयदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पवार, पोलीस अंमलदार अजय गायकवाड, हरिष मोरे, प्रवीण भालचिम, विठ्ठल वाव्हाळ, संजय आधारी, गणेश सिंग, विनोद महाजन, स्वप्निल कांबळे, वैभव रणपिसे, मनोज सांगळे, अशोक शेलार, अमोल वाडकर, रमेश राठोड, पोलीस अमलदार वैशाली माकडी, पोलीस शितल शिंदे यांनी केले आहे.












