
पुणे , 9 जुलै 2023: जेजुरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने डेक्कन परिसरातून दोन हल्लेखोरांना जेरबंद केले आहे. त्यांना जेजुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पुण्यातील गुरुवार पेठ येथील वनीस प्रल्हाद परदेशी तसेच जेजुरीतील धालेवाडी येथील रहिवासी महादेव विठ्ठल गुरव, उर्फ काका परदेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक महेबूब सय्यदलाल पानसरे असे हत्या करण्यात आलेल्या पिडीताचे नाव असून ते जेजुरी येथील रहिवासी आहे. 7 जुलै रोजी त्यांची हत्या झाली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी कोम्बिंग ऑपरेशन आणि प्रतिबंधात्मक कारवाया केल्या होत्या. शनिवारी एसीपी सतीश गोवेकर यांना पानसरे हत्या प्रकरणातील दोन प्रमुख संशयित डेक्कन परिसरात असल्याची माहिती मिळाली.
त्याअनुशंगाने मा.पोलीस उप आयुक्त, श्री. अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनानुसार खंडणी विरोधी पथक- २,गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक, मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार, सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, शंकर संपते, सैदोबा भोजराव, चेतन अपाटे, प्रदिप गाडे, पवन भोसले यांची दोन वेगवेगळी पथके तयार करुन आरोपींना डेक्कन परिसरातुन ताब्यात घेण्यात आले. आरोपींची चौकशी केली असता त्यांचा दाखल गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. तशी कबुली देखील आरोपींनी पोलिसांना दिली आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त, श्री. रितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त, श्री. संदिप कर्णिक, मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. रामनाथ पोकळे, मा.पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), श्री. अमोल झेंडे, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे – २ श्री. सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक – २, गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक, मोहनदास जाधव, पोलीस अंमलदार, सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, शंकर संपते, सैदोबा भोजराव, चेतन अपाटे, प्रदिप गाडे, पवन भोसले यांनी केली आहे.












