पुणे :- महाराष्ट्रभर आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजजागृती करणारे थोर,आधुनिक मराठी संत,समाजसुधारक व स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगे महाराज यांची पुणे येथील काळेवाडी परिसरात भव्य जयंती मिरवणूक काढण्यात येणार आहे.या जयंती महोत्सवात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संतोष गोतावळे यांनी केले आहे.
अज्ञान,अंधश्रद्धा, अस्वच्छता यांनी बुरसटलेल्या समाजाचा कीर्तनाच्या माध्यमातून समाज सुधारणेसाठी आपले जीवन व्यतीत करणारे महान संत गाडगे बाबा यांच्या कार्याचा उजाळा व्हावा यासाठी अखिल पिंपरी चिंचवड राष्ट्रसंत गाडगे बाबा जन्मोत्सव समितीच्या वतीने भव्य रथ यात्रा व मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार 25 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते नऊ हा कार्यक्रम असणार आहे.या कार्यक्रमासाठी मुख्य आकर्षण म्हणून लेझिम पथक,वारकरी दिंडी आणि भव्य रथ असणार आहे. तर 9.30 ते 9.30 दरम्यान प्रा.सोमनाथ नाडे यांचे व्याख्यान होणार आहे.त्यानंतर 9.30 ते 10 च्या दरम्यान तीर्थप्रसाद वाटप करण्यात येणार आहे.
या राष्ट्रसंत गाडगे बाबांची भव्य रथ यात्रा व मिरवणूक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संतोष गोतावळे यांनी केले आहे.