पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ११ : पिंपरी चिंचवड न्यायालय व पुणे जिल्हा विधी प्रधिकरण व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दि. ०९ रोजी राष्ट्रीय लोकअदालीचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये पिंपरी न्यायालायात विविध प्रकारचे 204 खटले निकाली काढण्यात आले. त्यामध्ये एकुण २ कोटी ७० लाख ४४ हजार १४९ रुपये महसूल जमा झाला व आकुर्डी येथील न्यायालयात 924 खटले निकाली काढण्यात आले.त्यामध्ये २२ कोटी ५४ लाख ०६ हजार ४६० रुपये महसूल जमा झाला.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पिंपरी चिंचवड अँडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजेश पुणेकर त्यांनी भूषवले.सदर कार्यक्रमाचे नियोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनचे अध्यक्ष ॲड. नारायण रसाळ उपाध्यक्षा अँड जयश्री कुटे, सचिव अँड गणेश शिंदे,यांनी केले. त्यावेळी महिला सचिव अँड प्रमिला गाडे, ऑडिटर अँड राजेश रणपिसे, सदस्य अँड स्वप्नील वाळुंज, अँड सौरभ जगताप, अँड प्रशांत बचुटे,अँड अक्षय केदार, उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अँड शोभा कड यांची होती तसेच पिंपरी न्यायालयाचे माननीय न्यायाधीश मा. आर. एस. वानखेडे साहेब, मा.आर.एम.गिरी साहेब, यांचा सत्कार पिंपरी-चिंचवड अँडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आला.
लोकन्यायालय करिता पॅनल अँडव्होकेट म्हणून काम एडव्होकेट सौ. निलम जाधव व एडव्होकेट अक्षय भालेराव तसेच आकुर्डी येथील न्यायालयात एडव्होकेट सुषमा पाटील यांनी पाहिले.राष्ट्रीय लोक अदालत निमित्त बार असोसिएशन तर्फे बालाजी विधी महाविद्यालयाचे सानिका शेवाळे,देवयानी नाईक,सरिता वैद्या,श्रावणी शिंदे,वैष्णवी पाटील,नेहा अहिरवल,पायल बोधक,समर्थ शेळके,सिद्धार्थ लोखंडे,दिक्षा नांद्रे ,चाणक्य वाडे,निखिल गिरी यांनी स्किट प्लेच्या माध्यमातून मध्यस्थी प्रक्रियेचे महत्त्व व जागृती पक्षकारांनसमोर सादर केली.
याप्रसंगी बालाजी विधी महाविद्यालयाचे प्रिन्सिपल डॉ मधूश्री जोशी मॅडम या देखील उपस्थित होत्या सदर पथनाट्यचे संयोजन अँड मंगेश खराबे यांनी केले . तसेच यावेळी एस एन बी पी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.माननीय न्यायधीश वानखेडे साहेब यांनी मार्गदर्शन करतांना नागरीकांना लोकअदालत व त्याचे महत्व सांगितले व जास्तित जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रमा करिता पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे मा.अध्यक्ष ॲड. सुदाम साने सर अँड सतीश गोरडे सर अँड सुनील कडूस्कर सर व. सरकारी वकील तसेच पिंपरी बारचे बहुसंख्य वकील बंधू भगिनी व पक्षकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन महिला सचिव.ॲड. प्रमिला गाडे यांनी केले. तर सर्वांचे आभार सचिव ॲड. प्रशांत बचुटे यांनी मानले..
दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम 89 चे तरतुदीनुसार प्रलंबित खटल्यांची संख्या कमी व्हावी व न्याय मिळणे सुकर व्हावे हयाकरीता उच्च न्यायालयातर्फे मुंबई व सर्व जिल्हा न्यायालयामध्ये मध्यस्थी केंद्राची स्थापना करण्यात आलेली आहे -ॲड.जयश्री कुटे(उपाध्यक्षा पिं.चिं अँड बार असोसिएशन)
समाजात आजही मोठ्या प्रमाणावर कायद्याविषयी अनभिज्ञता असून राष्ट्रीय, राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसेच विधी महाविद्यालये कायद्यांविषयीची जनजागृती करण्याचे मोलाचे काम करतात -ॲड.मंगेश खराबे (सभासद पिं.चिं अँड बार असोसिएशन)












