पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.१२ : मुंढवा चौक येथून प्रवास करणाऱ्या महिलेची रिक्षात विसरलेली पर्स शोधण्यात मुंढवा पोलिसांना यश आले आहे. सदर महिला या मुंढवा चौक येथून ते रॅडिसन चौक खराडी येथे प्रवास करत होत्या. ही घटना मंगळवर दि. ११ रोजी घडली आहे.
सदर घटनेचा तपास चंदननगर पोलिसांनी सुरु केले. तपास पथकातील पोलीस अंमलदार शिवाजी धांडे, नामदेव गडदरे, यांनी सीसीटीव्ही फुटेजव्दारे रिक्षाचा शोध घेतला. महिलेच्या पर्स मध्ये ३७ हजर पाचशे रुपये किमतीचा मुद्दे माल परत मिळवून दिला आहे. त्या सोबतच कानातले पाच ग्रॅम सोन्याच्या रिंगा,दोन पैंजण जोड, रोख रक्कम, आधारकार्ड, पॅनकार्ड. तीन एटीएम कार्ड या वस्तू मिळाल्या आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांगडे, पोलीस निरीक्षक मनिषा पाटील, यांच्या मार्गदर्शन खाली सहा.पोलीस निरीक्षक निलेश घोरपडे, पोलीस हवालदार शिवाजी धांडे, नामदेव गडदरे, सचिन रणदिवे, अविनाश सपकाळ, श्रीकांत शेंडे, श्रीकांत कोद्रे,गणेश हडकर यांनी केले आहे.












