पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. ०८ : मैत्रीणी सोबत झालेल्या वादात जखमी झालेल्या हाताला उपचारांसाठी जात असताना जखमी व्यक्तीला रिक्षा चालका सोबत दारू पिण्याचा मोह चांगलाच अंगलट आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना (दि.५) रात्री दोनच्या सुमारास आंबेगाव पठार परिसरातील प्यासा बार बाहेर घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उल्हास सावंत (रा. करंदी बुद्रुक, ता. भोर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या बाबत अधिक माहिती अशी कि फिर्यादी हे मैत्रिणीच्या घरी भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. फिर्यादीने रागाच्या भरात काचेच्या कपाटावर मारल्याने हाताला गंभीर जखम झाली. उपचारांसाठी जात असताना ‘तुमच्या हाताला लागले आहे, ‘तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो’ असे म्हणत आरोपीने रिक्षामध्ये बसवले.
सदर रिक्षा चालकाने दारू घेण्यासाठी प्यासा बार हॉटेल रिक्षा बाहेर थांबवली. फिर्यादी यांनी रिक्षा चालकाला ‘मलाही दारू प्यायची आहे’ असे सांगत त्यांनी देखील प्यासाभारमधून दारू घेतली. आरोपी व फिर्यादी हे रिक्षामध्ये दारू पीत बसले. आरोपीने शिक्षामधून खाली उतरून काही कारण नसताना लोखंडी हत्यार काढले. फिर्यादी यांच्या डोक्यात व हातावर मारून गंभीर जखमी केले आहे. या प्रकरणी आरोपी विरोधात भा.द.वि कलम ३०७, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वर्षा घागरे करीत आहेत.












