
पुणे दि १० : पुणे शहरात खून, खुनाचा प्रयत्न, रॉबरी, घरफोडी चोरी ,चैन स्नॅचिंग, फरार व तडीपार अशा रेकॉर्ड वरील आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत युनिट २ कडील हद्दीमध्ये दोन इसमांना अटक करण्यात आली आहे.त्यांच्या कडून दोन गावठी पिस्टल मॅगझीन सहा आठ जिवंत काडतुसे असा एकूण एक लाख शहात्तर हजार रुपये किंमतीचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे.
पेट्रोलिंग दरम्यान सदर आरोपी हे सिल्वर रंगाच्या कार मध्ये पिस्टल बाळगून बसल्याची माहिती युनिट २ कडील पोलीस अंमलदार गजानंद सोनुने यांना गुप्त बातमीदार कडून मिळाली. त्या प्रमाणे दोन पथके तयार करून रस्ताच्या दोन्ही बाजूने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. हनुमंत मोतीराम पवार वय ३१ रा. येवलेवाडी ता. खेड जि. पुणे, ऋषिकेश सुदाम बोत्रे वय २९ रा. मु.पो खालूंद्रे , ता.खेड, जि.पुणे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ऋषिकेश सुदाम बोत्रे याच्या वर चाकण पोलीस स्थानकात अग्निस्त्र जवळ बाळगण्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगीरी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह.पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त,गुन्हे, अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त सुनील तांबे, यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सह पोलीस निरीक्षक वैशाली भोसले, विशाल मोहिते, पोलीस उप निरीक्षक नितीन कांबळे, राजेंद्र पाटोळे, पोलीस अंमलदार गजानंद सोनुने,उज्वल मोकाशी, अमोल सरडे, पुष्पेंद्र चव्हाण, संजय जाधव, उत्तम तारू, साधना ताम्हणे, नामदेव रेणुसे, मोहसीन शेख, निखिल जाधव, शंकर नवसे,विनोद चव्हाण , नागनाथ राख यांनी केले आहे.












