पिंपरी(प्रतिनिधी) : रोटरी क्लब उद्योगनगरी- पिंपरी अध्यक्षपदी विवेक येवले , सचिवपदी डॉ विष्णू नांदेडकर व तसेच खजिनदार पदी श्रीनिवास कोरे यांची निवड करण्यात आली. पदग्रहण सोहळ्यास प्रांतपाल मंजू फडके,सहायक प्रांतपाल सदाशिव काळे व सभासद संचालक नितीन ढमाले आदी मान्यवर उपास्थित होते.
रविकिरण केसरकर (माजी अध्यक्ष),मल्लीनाथ कलशेट्टी (फौंडेशन संचालक),रमेश सातव (मेम्बरशिप),योगेश टिपरे (विशेष प्रकल्प),प्रशांत शेजवळ (क्लब ऍडमिन),
निलेश लोंढे (सेवा संचालक), जयंत आरावट (सांस्कृतिक प्रमुख),गुरुदास भोंडवे (पब्लिक इमेज ), वैभव गवळी (आयटी संचालक),भूषण पाटील व डॉ.समीक्षा जर्डे( कार्यकरी सदस्य) या नियुक्त सर्वांची पदाधिकारी यांना पदाची शपथ देण्यात आली.
प्रांतपाल मंजू फडके यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांना शुभेच्छा देत रोटरी उद्योगनगरी ह्या क्लब ने 4 वर्षातच संपूर्ण डिस्ट्रिक्ट मध्ये नावलौकिक केले व तळेगाव आंबी येथे उभारण्यात येत असलेल्या रोटरी हॉस्पिटलला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिला.नूतन अध्यक्ष विवेक येवले यांनी रोगनिर्मूलन अंतर्गत मुख कर्करोग, दत्तक गाव योजना,शिक्षण व्यवस्था ,शुद्ध पाणी, पर्यावरण संवर्धन, व आरोग्य शिबीर असे विविध प्रकल्प राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन विजया बोथे यांनी केले व प्रशांत शेजवळ यांनी आभार मानले.












