पिंपरी (प्रतिनिधी): रोटरी क्लब ऑफ निगडी च्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला विद्यार्थ्यांचा रोट्रॅक्ट क्लब ऑफ डॉ. डी. वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या सदस्यांनी शिरगाव येथील शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळा येथे पुस्तक भेट देवून एक मदतीचा हात दिला. यावेळी रोट्रॅक्ट क्लबने रू. ४०,०००/- किमतीच्या ६०० हून अधिक पुस्तके दान केली. यासाठी महाविद्यालयामध्ये आठवडाभरासाठी पुस्तक देणगी काउंटर सुरू करण्यात आले होते. कॉलेजचे विद्यार्थी आणि प्राध्यपकांनी स्वेच्छेने पुस्तके आणि आर्थिक निधी दान केला. यामध्ये कथा पुस्तके, पाठ्यपुस्तके, माहितीपर पुस्तके, शब्दकोश, नोटबुक, स्व-मदत पुस्तके, कला आणि हस्तकला पुस्तके, मासिके इत्यादींचा समावेश होता.
रोट्रॅक्ट क्लबच्या सदस्यांनी आश्रमातील विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवला. मुलांसोबत विविध खेळ खेळले. त्यांनी नृत्य देखील केले, गाणी गायली आणि त्यांच्यासोबत सुंदर प्रेरणादायीगोष्टी सांगितल्या. रोट्रॅक्ट क्लबच्या सदस्यांनी मुलांसोबत मिठाई आणि इतर खाण्याच्या पदार्थांचेही वाटप केले.
या मोहिमेने केवळ क्लब सदस्यांना आनंदच दिला नाही तर रोटरी-रोट्रॅक्ट चळवळ नक्कीच लाखो हृदयांना स्पर्श करू शकते आणि जगात आशा निर्माण करू शकते हे सिद्ध केले. डॉ. डी. वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्चच्या रोट्रॅक्ट क्लबचे ब्रीदवाक्य “मानवतेची सेवा” याची खऱ्या अर्थाने प्रचिती झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन साठी रोट्रॅक्ट क्लबचे सल्लागार प्रा तेजश्री गुळवे, डॉ सुनीता पाटील, प्रा शिवाजी वसेकर तसेच रोटरॅक्ट क्लब डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च चा विद्यार्थी प्रतिनिधी लौकिक मराठे, विद्यार्थी समुदाय सेवा संचालक प्रांजल बनकर यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजन साठी डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च च्या प्राचार्या डॉ अनुपमा पाटील , उपप्राचार्य डॉ सुनील डंभारे, कुलकचिव वाय के पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.