पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २५ : तरुणीस लग्नाचे आम्ही दाखवून भलत्याच मुलीशी विवाह केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
पीडित महिलेने अविनाश शिवाजी पाटील ( वय ३१, रा. राधानगरी, कोल्हापूर ) याच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी महिलेने जीवनसाथी डॉट. कॉम या सोशल साइटवर लग्नासाठी प्रोफाइल बनवली होती. आरोपीने ती प्रोफाइल पाहून फिर्यादी यांना रिक्वेस्ट पाठवली आणि लग्न करण्यासाठी तयारी दर्शवली. आरोपीने फिर्यादी यांना भेटण्यासाठी बोलवून त्यांच्या संमती शिवाय जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच मी तुझ्याशी लग्न करतो असे आमिष सुद्धा दिले. त्यानंतर फिर्यादी यांना कसलीच कल्पना न देता भलत्याच मुलीशी विवाह करून त्यांची फसवणूक केली आहे. आपली फसवणूक झाल्याचे कळताच फिर्यादी त्यांच्या भावासह आरोपीच्या घरी गेल्या असता, त्यांना तुला काय करायचे ते कर असे म्हणून शिवीगाळ करत हाकलून दिले.
आरोपीवर भादवि कलम ३७६ ( २ ) ( एन ),३७७,५०४ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. अद्याप आरोपीला अटक करण्यात आले नसून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उप निरीक्षक बोरकर हे करत आहेत.












