विद्युत निरीक्षक कार्यालयातील लिपिकांनी लाच मागितल्या प्रकरणी त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणी एका २९ वर्षीय पुरुषाने विश्रामबाग पोलीस स्टेशन मध्ये आरोपी लोकसेवक श्री. सचिन विष्णु गाजरे (वय 37वर्षे, पद- वरिष्ठ लिपिक, विद्युत निरीक्षक कार्यालय, सदाशिव पेठ) व बाळू काशिनाथ बिडकर ,वय 57 वर्षे, पद- चालक ( सद्या अतिरिक्त कार्यभार— आवक जावक लिपिक यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
फिर्यादी यांना विद्युत ठेकेदारीचा परवाना हवा होता. याबाबत आरोपी गाजरे यांनी फिर्यादी यांच्याकडे परवाना देण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच आवक जावक लिपिक बिडकर यांनी फिर्यादी यांची फाईल पुढे पाठवण्यासाठी दोन हजार रुपयांची मागणी केली
फिर्यादींनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सापळा रचून दोन्ही आरोपींना रंगेहात पकडण्यात आले आहे.
आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७, कलाम ७ अ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सदर गुन्ह्याची कारवाई मा.पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे, ला. प्र. वि पुणे परिक्षेत्र मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शितल जानवे, ला. प्र. वि पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युलता चव्हाण, पोलिस निरीक्षक, लाप्रवि, श्रीराम शिंदे पोलीस निरीक्षक, पोलिस अंमलदार मपोह वेताळ, पो शि तावरे,
चालक पो शि माळी व संपूर्ण लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
लोकसेवकांनी लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालय येथे संपर्क साधण्याचे आवाहन श्री.अमोल तांबे पोलीस अधीक्षक ला. प्र. वि पुणे यांनी नागरिकांना केले आहे.
लाच मागितल्या प्रकरणी दोन लिपिकांचा पर्दाफाश












