पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २६ :
पिंपरी(प्रतिनिधी) लायन्स क्लब निगडीच्या वतीने निगडी येथे सुरू करण्यात आलेल्या ” स्किल टू सक्सिड ” कौशल्य केंद्र क्रमांक 2 चे उदघाटन प्रांतपाल विजय भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले.या कौशल्य केंद्रामार्फत औद्योगिक क्षेत्रात कौशल्य विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.प्रेरणा कौशल्य विकास चे संचालक अशोक येवले उषा येवले यांच्या पुढाकाराने हे केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या संस्थेतर्फे सीएनसी/व्हीएमसी रोबोटिक्स, स्प्रे पेंटिंग आणि वेल्डिंगचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल .
लायन्स क्लब निगडीच्या अध्यक्षा मीनांजली मोहिते, अशोक आणि उषा येवले, भारती टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संचालक नंदकिशोर जगदाळे, ओंकार जगदाळे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
यावेळी श्याम खंडेलवाल, राजेंद्र गोयल, आनंद आंबेकर, धनराज मंगनानी यांनी केंद्राला शुभेच्छा दिल्या.
यावेळी जयश्री मांडे, सीमा आणि संतोष बांदेकर, दिलीपसिंह मोहिते, सुदाम मोरे, मंजिरी आणि प्रशांत कुलकर्णी, रामकृष्ण मंत्री, प्रवीण शेलार यांनी यावेळी उपस्थित होते.












