पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. २४ : ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांच्या लेखनप्रवासाला 40 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे त्यांचा जाहीर सत्कार समारंभ शनिवारी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम शनिवार, दि. 29 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे होणार आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी दिली.
गझलकार भूषण कटककर यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात निमंत्रित गझलकारांचे मराठी गझल संमेलन आयोजित करण्यात आले असून यात रेखा कुलकर्णी, तनुजा चव्हाण, कामिनी केंभावी, वैजयंती विंझे-आपटे, अजय जोशी, वैशाली माळी, उर्मिला वाणी, स्वाती यादव, सुजाता पवार, वर्षा कुलकर्णी, ज्योत्स्ना चांदगुडे, प्रभा सोनवणे, प्राजक्ता गोखले-पटवर्धन यांचा सहभाग असणार आहे, असे रंगत संगत प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर यांनी सांगितले. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.












