पुणे | प्रतिनिधी
पुणे दि.२४ : बहिणीला का छेडतो असा जबाब विचारून वसाहतीमध्ये हवेत कोयता फिरवून दहशत पसरवणाऱ्या लोंढे टोळीतील सात जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची ५३ वी मोक्का कारवाई आहे.
संकेत देविदास लोंढे (टोळी प्रमुख) ( वय-२० रा. गल्ली नं. १३. जनता वसाहत, पर्वती पायथा), प्रतिक ऊर्फ बिटया पांडुरंग कांबळे (वय-२०रा. स.नं. १२२, चुनाभट्टी, सिंहगड रोड, पुणे ), अजित ऊर्फ आज्या संजय तायडे ( वय २० वर्षे, रा. जनता वसाहत, पुणे ), शुभम दिगंबर गजघने ( वय- १९ वर्षे, रा. परिवर्तन बिल्डींग, दांडेकर पुल पुणे ) अशी आरोपींची नावे असून ३ विधिसंघर्षित बालके आहेत.
फिर्यादी हे दांडेकर पुलावर शतपावली करण्यासाठी पायी जात असताना आरोपींनी त्यांना अडवून ” बहिणीला का छेडतो ” या कारणावरून मारहाण करायला सुरुवात केली. टोळीतील एका अल्पवयीन मुलाने एक धारदार हत्यार काढुन ” भाई लोकांना शिवी देतो का ? तुला खल्लास करतो. ” असे म्हणत फिर्यादी यांच्या गळ्यावर कोयत्याने वार केला. थोडक्यात फिर्यादीने तो चुकवला. सदर टोळी वसाहतीत येऊन ” घडलेल्या प्रकाराची फिर्यादी यांनी तक्रार दाखल केली तर एक-एकाचा मर्डर करुन टाकेन ” अशी धमकी देऊन परिसरात दहशत निर्माण केली. सदर टोळी प्रमुख विरोधात मागील ६ गुन्हे दाखल आहेत.
सदर आरोपीं विरोधात भा.दं.वि.कलम ३०७,४५२, १४३, १४४,१४७, १४८, १४९, ३२३, ५०४, ५०६ आर्म अक्ट ४ (२५). म.पो.अधि. कलम ३७(१)१३५ महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा कलम ३ (१)(ii)३ (४) अंतर्गत पर्वती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहा.पोलीस आयुक्त सिंहगड विभाग,अप्पासाहेब शेवाळे हे करीत आहेत. सदर कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त, परि -०३ सुहेल शर्मा, सह पोलीस आयुक्त, सिंहगड रोड अप्पासाहेब शेवाळे यांचे मार्गदर्शनाखाली पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विजय खोमणे, पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, पोलीस अमलदार दिपक लोधा, महेश चौगुले, गोरख मादगुडे, राजू जाधव, कुंदन शिंदे, जगदीश खेडकर यांनी केली आहे.












