माजी भारतीय क्रिकेटर आणि भाजप खासदार गौतम गंभीर यांनी राजकारणातून संन्यास घेण्याची मोठी घोषणा केली आहे. गौतम गंभीर यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे.
मला राजकीय कर्तव्यातून मुक्त करा, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. गौतम गंभीरने ट्वीट करत जे. पी. नड्डा यांच्याकडे ही मागणी केली आहे. राजकीय कर्तव्यातून मुक्त केल्यानंतर क्रिकेटवर लक्ष केंद्रीय करेन, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे.
भारताचा माजी सलामीवीर आणि भाजप खासदरा गौतम गंभीरने राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. गौतम गंभीरने राजकारणाला रामराम ठोकण्याचा निर्धार केला आहे. गौतम गंभीरला त्यांच्या राजकीय जबाबदारीतून मुक्त व्हायचं आहे. त्यासाठी त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणीही केली आहे. गंभीरने एक्स मीडिया म्हणजेच ट्विटरवर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. एक्स मीडियावरील पोस्टमध्ये गौतम गंभीरने राजकारणापासून दूर राहण्याची घोषणा केली. क्रिकेटमुळे राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं गंभीरने सांगितलं आहे.
गौतम गंभीर हा सध्याचा पूर्व दिल्लीतील भाजप खासदार असून त्याने आता 2024 ची लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केली आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यापूर्वीच गौतम गंभीरने राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पूर्व दिल्लीच्या जागेवर गंभीरने दमदार विजय मिळाला होता.