पुणे | प्रतिनिधी
पुणे, दि. १२ : मांजरी येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना लोखंडी पट्टी मजुरीच्या अंगावर पडून त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
पोलिसांच्या अधिक माहितीनुसार विठ्ठल गडदे (वय 29) असे मृताचे नाव असून तो मांजरीतील एका गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी काम करत होता.
इमारतीच्या चौथ्या मजल्यावर काम करत असताना, अचानक लोखंडे पट्टी त्याच्यावर पडल्याने ती गंभीर जखमी झाला. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी मृत बांधकाम कामगाराच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात कामगारांना योग्य सुरक्षा उपकरणे पुरविण्यात आली नसल्याचे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणी अशोक किसन शिंदे (वय ५५) या कंत्राटदारावर संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.












