लोणावळ्यात पॉर्न व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून लोणावळ्यातील पाटण गाव येथील एका विल्हावर हा सर्व गोरख धंदा सुरू होता. वेगवेगळ्या राज्यांतून काही तरुण आणि तरुणी एकत्र येऊन त्या ठिकाणी पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. काही व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी १५ पैकी १३ जणांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या अश्लील ओ.टी.टी प्लॅटफॉर्मसाठी काही तरुण आणि तरुणी लोणावळ्यातील विल्हावर पॉर्न व्हिडिओ तयार करत होते. भारतात पॉर्न व्हिडिओ तयार करणे कायद्याने गुन्हा आहे. पॉर्न व्हिडिओ करण्यावर बंदी आहे. असे असताना ही १५ जणांची टोळी लोणावळ्यात बिनधास्त पॉर्न व्हिडिओ तयार करत होती.
१५ जणांमध्ये पाच तरुणींचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हे सर्व तरुण आणि तरुणी भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील आहेत. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी विल्हावर छापा टाकून १३ जणांना अटक केली आहे. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळावरून पॉर्न व्हिडिओ शूट करण्यासाठी लागणारे कॅमेरे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.