
पुणे : लोणीकंद परिसरात गावठी हातभट्टी दारुचे अवैध धंदे सुरू होते. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या तपास पथकाच्या दोन टिम तयार करुन त्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले.
त्यानुसार सपोनि गोडसे, सपोनि जाधव व त्यांच्या टिमने सदर ठिकाणी जाऊन एका विशिष्ट अंतरावर वाहन लावुन जवळच एका पडीक जागेतील हातभट्टीच्या धंदयावर छापा टाकला. त्यामध्ये त्यांनी ७० लिटर दारू जप्त करुन, २५०० लिटर रसायन, त्याशिवाय दारु गाळण्याचे लोखंडी बॅरल, अॅल्युमिनिअमचा पाईप असे साहित्य जप्त करून नष्ट केले आहे.
पोलिसांनी हातभट्टी चालक व दोन इसमांना अटक केली आहे. हातभट्टीसाठी लागणा-या मालाचा पुरवठा करणारा इसम फरार आहे. पुढील तपास सपोनि रविंद्र गोडसे हे करत आहेत.
आरोपीं विरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (फ) (ब) (क), ८३ प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री. रंजनकुमार शर्मा मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४, पुणे शहर, श्री. शशिकांत बोराटे मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे शहर, श्री. संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विश्वजीत काइंगडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर, श्री. मारुती पाटील पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती सीमा ढाकणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथकाचे सपोनि रविंद्र गोडसे, सपोनि गजानन जाधव, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकाटे, सागर जगताप, कैलास साळुंके, विनायक साळवे, स्वप्निल जाधव, अमोल ढोणे, साई रोकडे, सचिन चव्हाण, प्रशांत धुमाळ, महिला पोलीस अंमलदार वृंदावणी चव्हाण, कोमल भोसले, निलम कोळेकर लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे शहर यांनी केली आहे.












