पुणे दि. ७ : गेल्या काही दिवसांपासून लोणी काळभोर परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरोधात स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्त मा. रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्या नंतरची एम.पी.डी.ए कायद्यान्वेय स्थानबद्धतेची हि २५ वी कारवाई आहे. सत्यवान शाखा राठोड (वय ३३ रा.काळेशिवार, शिंदवणे ता.हवेली,जि.पुणे) असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
लोणी काळभोर स्थानकाच्या हद्दीत आरोपी काही साथीदारांसह गावठी दारू तयार करणे व विक्री करणे या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील होता. तसेच मागील पाच वर्षांमध्ये आरोपी विरोधात चार गुन्हे दाखल आहेत.सदर आरोपामुळे स्थानिक परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास व जिवीतास धोका निर्माण झाला आहे.
सदर आरोपीला नाशिक मध्यवर्ती कारागृहात एम.पी.डी.ए कायद्यान्वेय एक वर्षा करीता स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण लोणी काळभोर पोलीस स्थानक व वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांगुडे पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी पार पडले आहे.
लोणी काळभोर येथील सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई












