पुणे 8 जुलै 2023 : लोहेगाव-वाघोली रोडवर असलेल्या पेट्रोल पंपावर लुटमारीचा बेत उधळून लावत पाच जणांना विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींना पोलिसांच्या पथकाने गुरुवारी लोहेगाव येथून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना फॉरेस्ट पार्क-लोहेगाव रस्त्यावर काही पुरुष लपून बसल्याची माहिती मिळाली होती. तसेच आरोपींकडे शस्त्रे देखील आहेत अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून उमेश राम गायकवाड (३०), सूर्यकांत धोंडिबा रासगे (४२), संतोष हरिदास गायकवाड (३७), नितीन शंकर जाधव (२९), शेखर सीताराम गायकवाड (५८) या पाच आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी चार आरोपी मुंढवा येथील रहिवासी आहेत, तर एक हडपसर येथील रहिवासी आहे. तपासादरम्यान आरोपींनी लोहेगाव-वाघोली रोडवर असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा कट रचल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडे एक मोठा स्क्रू ड्रायव्हर, कटावणी, हेक्साब्लेड फ्रेमसह, दोरी व मिरची पुड असे दरोड्याचे साहीत्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींच्या विरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात भादंविक ३९९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि विजय चंदन करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, श्री. रंजन कुमार शर्मा मा. पोलीस उप आयुक्त, श्री शशिकांत बोराटे, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. संजय पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री. विलास सोंडे पोलीस निरीक्षक गुन्हे संगीता माळी, सपोनि विजय चंदन, पोलीस उप निरीक्षक श्री. रविंद्र ढावरे पोलीस अंमलदार अविनाश शेवाळे, अंकुश जोगदंडे, सचिन कदम, रुपेश पिसाळ, सचिन जाधव, नाना कर्चे, गिरीष नाणेकर, योगेश थोपटे, विशाल निलख, दादा बर्डे, ज्ञानेश्वर आवारी यांच्या पथकाने केली आहे.
लोहेगाव-वाघोली रोडवरील पेट्रोलपंप लुटण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला












