राज्यातील अनेक घडामोडीं नंतर मविआ ने वंचितला आपल्या बराबर घेतले २०१९ मध्ये वंचितचा काँग्रेस,राष्ट्रवादीला मोठा फटका बसला होता. त्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली. पण वंचितला मविआ मध्ये स्थान मिळाले नाही. नंतर माविआत समावेश झाल्या नंतर आता वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे अखेर लोकसभा जागांची मागणी केली आहे. वंचितनेआघाडीकडे एकूण २७ जागांची मागणी केली आहे. विशेष म्हणजे वंचितने ४८ पैकी २७ जागांवर दावा केल्याने राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
महाविकास आघाडीतील ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसच्याच अनेक जागांवर वंचितने दावा सांगितला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीची आज बैठक होती. या बैठकीत वंचितने २७ जागांची मागणी केल्याचं सांगितलं जात आहे. वंचितने ज्या जागा मागितल्या त्याची नावेही व्हायरल झाली आहेत. त्यातील अनेक जागांवर काँग्रेस, शरद पवार आणि अजित पवार गटाचे आमदार आहेत. तरीही वंचितने या जागा मागितल्या आहेत. काही काँग्रेस ज्या जागांवर सतत पराभूत होत आलेली आहे, अशा जागाही मागण्यात आल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीबद्दल महाविकास आघाडीची लपवाछपवीची रणनीती आणि उदासीन वृत्ती लक्षात घेऊन याआधी वंचितने ज्या मतदारसंघात निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली होती. त्या लोकसभा मतदारसंघाची यादी वंचितने तयार केली होती. आता महाविकास आघाडीने वंचितसोबत चर्चा सुरु केली आहे. तरीही वंचितने पूर्ण तयारी केलेल्या त्या मतदारसंघांची यादी महाविकास आघाडीला दिली आहे, असं वंचितने म्हटलं आहे.
वंचित बहुजन आघाडी स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरी गेली असती, तर या यादीतील मतदारसंघातील जागा लढविल्या असत्या. पण, आता वंचितला आशा आहे की, या मतदारसंघांवर तीन पक्षांसोबत फलदायी चर्चा आणि वाटाघाटी होतील. दरम्यान, वंचितच्या मागणीवर अंतर्गत चर्चा करून आणखी एक बैठक घेण्यास महाविकास आघाडीने सहमती दर्शवली आहे, असं वंचितने म्हटलं आहे.